'आई अंबाबाई'मुळे देवीचे घरबसल्या दर्शन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यपीठ असलेली महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून साम वाहिनीवर यंदाही स्टार रिफाइंड ऑइल प्रस्तुत "आई अंबाबाई' विशेष मालिका प्रसारित झाली. या मालिकेअंतर्गत प्रेक्षकांसाठी झालेल्या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना शनिवारी बक्षीस वितरण झाले.

मालिकेमुळे घरबसल्या देवीचे दर्शन आणि त्याचबरोबर रोजच्या आरतीसह सर्व धार्मिक विधी पाहायला मिळतात. प्रत्येक वर्षी साम वाहिनीने या मालिकेचे प्रसारण करावे, अशा भावना या वेळी विजेत्या भाग्यवान प्रेक्षक भाविकांनी व्यक्त केल्या.

कोल्हापूर - राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यपीठ असलेली महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून साम वाहिनीवर यंदाही स्टार रिफाइंड ऑइल प्रस्तुत "आई अंबाबाई' विशेष मालिका प्रसारित झाली. या मालिकेअंतर्गत प्रेक्षकांसाठी झालेल्या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना शनिवारी बक्षीस वितरण झाले.

मालिकेमुळे घरबसल्या देवीचे दर्शन आणि त्याचबरोबर रोजच्या आरतीसह सर्व धार्मिक विधी पाहायला मिळतात. प्रत्येक वर्षी साम वाहिनीने या मालिकेचे प्रसारण करावे, अशा भावना या वेळी विजेत्या भाग्यवान प्रेक्षक भाविकांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, माणिकचंद ऑक्‍सिरिचचे गिरीश शहा, चितळे प्रॉडक्‍ट्‌सचे गिरीश चितळे, जाधव इंडस्ट्रीजचे चंद्रकांत जाधव, वामाज सिल्क सारीजचे गिरीश कर्नावट, महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी, श्रीपूजक मंडळाचे माधव मुनिश्‍वर आदींच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिसे देण्यात आली.

महाराष्ट्रासह गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, दिल्ली आदी राज्यांतील प्रेक्षकांचाही स्पर्धेसाठी मोठा प्रतिसाद मिळाला. पत्राद्वारे आणि "एसएमएस'च्या माध्यमातून हजारो प्रेक्षक स्पर्धेत सहभागी झाले. त्यात महाविजेते ठरलेल्या सुनीता राजन कामठे (फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे), लक्ष्मी बळवंत पाटील (म्हालसवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर), ज्योती सागर बरगे (पुंगाव, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), रेणुका भारती (गणेश मळा, सिंहगड रस्ता, पुणे), योगेश शहापूरकर (फोंडा, गोवा) यांना श्री महालक्ष्मीची त्रिमितीय भव्य प्रतिमा आणि अभिषेकाची संधी मिळाली.
श्रद्धा संभाजी टेमगिरे (विश्रांतवाडी, पुणे), प्रशांतकुमार यशवंतसा क्षत्रिय (हनुमानवाडी, पंचवटी, नाशिक), डॉ. गौरी अनिल कुलकर्णी (मोरया हाउसिंग सोसायटी, सोलापूर), अर्जुन गौड (मंगळवार पेठ, कोल्हापूर), जगदीश बेंडकर (नायगाव, कोळीवाडा, वसई, पालघर) या उपविजेत्यांना श्री महालक्ष्मीची नथ बक्षीस दिली जाणार आहेत. यापैकी गौड यांना बक्षीस देण्यात आले.

उत्तेजनार्थ बक्षिसे लवकरच
दहा उत्तेजनार्थ बक्षिसे लवकरच जाहीर केली जाणार असून, त्यांना प्रत्येकी एक पैठणी साडी अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. "सकाळ'चे मुख्य व्यवस्थापक (कमर्शिअल प्रिंटिंग) प्रदीप सोनार, संभाजी गंडमाळे यांनी सर्वांचे स्वागत केले. "साम'चे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र कुरुंदकर यांनी संयोजन केले. लेखक युवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ऊर्जा क्रिएशन्सचे अरुण नाईक या वेळी उपस्थित होते. दरम्यान, मालिकेचे मुख्य प्रायोजक माणिकचंद ऑक्‍सिरिच, तर जाधव इंडस्ट्रीज, वामाज सिल्क सारीज, चितळे प्रॉडक्‍टस्‌, आनंदी वास्तू दिनदर्शिका, प्रलशर बायोटेक, अजित सीडस्‌, स्वामिनी साडी, एसपीएनएस फर्निचर, आदर्श डेअरी प्रॉडक्‍टस्‌, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पीएमसी बॅंक, पितांबरी सहप्रायोजक होते. या कार्यक्रमाला पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती व श्रीपूजक मंडळ यांचे सहकार्य लाभले.

पुढेही सहकार्य
प्रत्येक नवरात्रोत्सवात साम वाहिनीवरील "आई अंबाबाई' या मालिकेची उत्सुकता असते. यंदाच्या या विशेष मालिकेलाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मालिकेच्या योगदानात आमचा सहभाग असल्याचा अभिमान वाटतो. येत्या काळातही मालिकेसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही या वेळी प्रायोजकांनी दिली.

तनिष्का व्यासपीठाचा सहभाग
आगामी काळात धार्मिक पर्यटनावर अधिक भर द्यावा लागणार आहे. त्याशिवाय महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे तनिष्का गटाच्या प्रमुख हर्षदा मेवेकरी-जाधव यांनी सांगितले. या वेळी गटाच्या सभासद उपस्थित होत्या.

भारती भारावले
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील रेणुका भारती या स्पर्धेत महाविजेत्या ठरल्या. त्यांचे पती तुषार भारती यांनी बक्षीस स्वीकारले. हातगाडीवरून कांदा-बटाटा विक्रीचा त्यांचा व्यवसाय असून, बक्षीस स्वीकारल्यानंतर ते भारावून गेले.

Web Title: aai ambabai special serial release