Abdul Sattar : फडणवीसांनी सत्तारांची केली कानउघडणी, CM शिंदेंकडेही केली तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

devendra fadnavis

Abdul Sattar : फडणवीसांनी सत्तारांची केली कानउघडणी, CM शिंदेंकडेही केली तक्रार

सत्तार चुकले. पण खोक्यांची भाषा योग्य नाही. राजकारणामध्ये बोलण्याची पातळी खूप खाली चालली आहे. असे विधान करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांची चांगलीच कानउघडणी केली. इतकेच नव्हे तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारदेखील केली. (Abdul Sattar Controversy Devendra Fadnavis Eknath Shinde Supriya Sule maharashtra politics )

आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान शिवसेना युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेणार का, असा रोखठोक सवाल उपस्थित केला होता.

दरम्यान, उपमुख्यमंत्री यांनी सत्तारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माध्यामांशी बोलताना सत्तार यांची चांगलीच कानउघडणी केली.

काय म्हणाले फडणवीस?

'कुणीही महिलाबद्दल अपशब्द काढू नये. अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्याचा विरोध करू. जसे आमच्या कडच्या मंडळींना जसे नियम लागू आहे तसे त्यांना देखील लागू आहे'. राजकारणात आचारसंहिता पाळली पाहिजे. दोन्ही बाजूने आचारसंहिता पाळली पाहिजे, असं म्हणत फडणवीस यांनी सत्तार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

तसेच, आचारसहिंता दोन्ही बाजूने पाळली पाहिजे. सत्तार चुकले. पण खोक्यांची भाषा योग्य नाही. राजकारणामध्ये बोलण्याची पातळी खूप खाली चालली आहे. सगळीकडच्या लोकांनी आचार संहिता पाळली पाहिजे मोठ्या नेत्यांनी आपल्या लोकांना सांगितलं नाही, तोवर हे शक्य नाही , असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फडणवीस यांनी तक्रार केली आहे.

सत्तार काय म्हणाले होते?

औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिंशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं