Agriculture News : विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार शेतीचे धडे! कृषिमंत्री सत्तारांची दिली महत्वपूर्ण माहिती

abdul sattar
abdul sattar esakal

विद्यार्थ्यांना आता कृषी हा विषय देखील त्यांच्या शाळेत शिकता येणार आहे. राज्य सरकारकडून शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज (ता. 25) शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. तसेच याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

कृषिमंत्री सत्तार यांनी यासंदर्भातील अहवाल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल देखील उपस्थित होते. साम टीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

abdul sattar
Barsu Refinery News :…तर प्रोजेक्ट अडचणीत येईल; शरद पवारांची उद्योगमंत्री सामंतांशी चर्चा

हेही वाचा - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अभ्यासक्रमात काय असेल?

कृषी शिक्षणविषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा पद्धतीने अभ्यासक्रम ठेवावा. कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे जे साहित्य आणि मदत लागेल, ते करण्याची कृषी विभागाची भूमिका असल्याचे अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

तसेच शालेय अभ्यासक्रमातील इतर सर्व विषयांच्या सहसंबंधातून शेतीचे महत्व, उपयोजना, व्यवसाय संधी, शेतीविषयक जाणीव अशा अनेक पैलूंकडे लक्ष केंद्रीत करुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल, असा विश्वास मंत्री सत्तार यांनी व्यक्त केला.

abdul sattar
Team India : धोनीने बदलली कारकीर्द अन् रहाणेसाठी उघडलं टीम इंडियाचं दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com