Abhijit Bichukale : कसबा पोटनिवडणुकीच्या रिंगणात अभिजीत बिचुकले; पण स्वतः लढणार नाहीत

Abhijit Bichukale
Abhijit Bichukaleesakal

पुणेः ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपतीपदापर्यंत सगळ्यात निवडणुकांमध्ये सहभाग घेणारे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आता पोटनिवडणुकीत उतरणार आहे. पुण्यातल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय बिचुकले यांनी घेतला आहे. मात्र प्रत्यक्ष ते ही निवडणूक लढणार नाहीत.

कसबा पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र घेतले आहेत. शिवसेनेतील संजय मोरे, विशाल धनवडे तर वंचित बहुजन आघाडीकडून भेंगडे यांनी घेतले नामनिर्देशन पत्र घेतले.

दुसरीकडे शैलेश टिळक यांनीही नामनिर्देशन पत्र घेतले. तसेच काँग्रेसकडून कौस्तुभ गुजर तर राष्ट्रवादीकडून नलावडे यांनी घेतले अर्ज घेतला आहे.

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांच्या पत्नी अलकृंता बिचुकले यांनी अर्ज घेतला आहे. बिचुकले थेट निवडणुकीच्या मैदानात उतरले नसले तरी ते पत्नीच्या माध्यमातून रणांगण गाजवणार, असं दिसतंय.

हेही वाचाः रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

पुणे जिल्ह्यात चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून त्यानुसार मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

Abhijit Bichukale
Ajit Pawar Controversy : "संभाजी महाराजांना जे धर्मवीर मानत नाही त्यांची.." पडळकरांचं वादग्रस्त विधान

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबवण्यात आला. यानुसार ५ जानेवारी २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

त्यानुसार २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघात ३ लाख १ हजार ६४८ पुरुष, २ लाख ६४ हजार ७३२ स्त्री आणि ३५ तृतीयपंथी याप्रमाणे एकूण ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार संख्या आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत ४८ हजार १०६ ची वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com