तीन वर्षांवरील मुलांनाच "प्ले स्कूल'मध्ये प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मुंबई - राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार तीन वर्षांखालील मुलांना "प्ले स्कूल'मध्ये प्रवेश देता येणार नाही. अशी मुले आढळून आल्यास "प्ले स्कूल'ची मान्यता रद्द केली जाणार आहे. 

देशात 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना सरकारी, खासगी तसेच समाजसेवी संस्था शिक्षण देतात. अंगणवाड्यांतही या वयोगटातील मुलांना शिक्षण दिले जाते; परंतु खासगी क्षेत्रातून "प्ले स्कूल', "प्ले ग्रुप्स', "प्री-स्कूल्स'च्या नावे नियमबाह्य गोष्टी होत असल्याने राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. केवळ 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना खासगी संस्थांकडून "प्री-स्कूल' शिक्षण देता येईल. 

Web Title: Access to children in three years Play School