मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; सहा ठार, तीन जखमी

शुक्रवार, 10 मे 2019

- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे झाला हा अपघात.

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एक दुचाकी यांचा आज (शुक्रवार) भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. यातील जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कारसमोर दुचाकीस्वार आल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात तीनही वाहनांचा चक्काचूर झाला. मृतांमधील राकेश शाह, प्रतिभा शाह हे कांदिवली येथील रहिवासी असून, बी डी जाधव हे पालघरमधील सूर्या प्रकल्पात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. नवनाथ नवले हे मोखाडा येथील रहिवासी असून, आकाश चव्हाण आणि दिलीप चंदने असा एकूण सहा जणांचा यामध्ये मृत्यू झाला. तर जिनल शाह या गंभीर जखमी झाल्या असून, पुढील उपचारांसाठी त्यांना गुजरातमधील हरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Mumbai Ahmedabad National Highway 6 Died