मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; कार पडली 15 फूट खाली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

- मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

कल्याण : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. हॉटेल झी ग्रार्डनसमोर पुलावरून एक कार (एम.एच. 05. इ.ए. 5576) 15 फूट उंचीवरून खाली पडली. त्यामुळे या कारमधील तीनजण जखमी झाले आहेत. ही घटना मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामध्ये जखमी झालेल्या लोकांना पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यामध्ये गंभीर जखमी झालेल्या लोकांना एमजीएम, पनवेल येथे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये राजेश शशिकांत मोरे,  संध्या नथू पाटील आणि प्रीती दत्तू कडवे अशी जखमींची नावे आहेत. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जात आहेत. 

Image result for accident

दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Mumbai Goa Highway