संकेश्वरनजीक अपघातात भाऊ-बहिण जागीच ठार

संकेश्वरनजीक अपघातात भाऊ-बहिण जागीच ठार

संकेश्वर : येथील महामार्गावर हरगसपूर गेट शिदेवाडीनजीक तीन वाहनांमध्ये अपघात झाला. यामध्ये भाऊ-बहिण जागीच ठार झाले तर पती-पत्नी जखमी झाले. सदर अपघात आज सकाळी अकराच्या सुमारास झाला. 

यासंदर्भात घटनास्थळावरुन व संकेश्बर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की हरगसपुरगड येथून दुचाकी क्र. केए. 24. 9096 वरुन भैरु दशरथ शेलार (वय 30) व त्याची बहिण अनिता बाळकृष्ण कुराडे (वय २८ रा. शिप्पुर ता हुक्केरी) हे दोघे शिप्पूरला जात असता हरगापूर गेटनजीक आल्यानंतर त्यांना पाठिमागून येणाऱ्या कारने (जीए. 08. 8807) ने जाेरदार धडक दिली. त्यानंतर पुढे दुचाकीला फरफटत नेऊन रस्त्याकडेला थाबलेल्या मिनी ट्रक (आयशर) क्र. (केए २५ ७१३७) ला पाठीमागून चिरडले.

यामध्ये दुचाकीवरील दाेघे भाऊ-बहिण जागीच ठार झाले. त्यांच्या शरीराचे अवयव वेगवेगळे झाले. तर कारमधील पती-पत्नी राहुल शंकर पाटील व सुविधा राहुल पाटील दाेघेही (रा. कराड  जि. सातारा) हे जखमी झाले आहेत. त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

घटनास्थळावरील चित्र अंगावर शहारे आणणारे होते. दोघा मयताचे गाव अवघ्या दोन किमी अंतरावर असल्याने नातेवाईकांची मोठी गर्दी केली होती. 

घटनास्थळी फौजदार आर. एम. तहसीलदार व हवालदार गुंजगी यानी भेट देऊन पंचनामा केला.

मयत भैरुच्या पश्चात आई-वडील, पत्नी मुलगी, भाऊ-भावजय असा परिवार आहे. तर मयत अनिताच्या पश्चात सासू-सासरे, पती, मुलगी असा परिवार आहे.

अपघातातील दोन्ही मृतदेह पंचनामा करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. भैरु याच्यावर हरगसपुरात तर अनितावर शिपूर येथे अंत्यविधी करण्यात आला.
 
अनिताची तब्बेत ठिक नव्हती. उपचारासाठी ती माहेरी आली होती. उपचार घेऊन सासरला परतत असताना हा अपघात झाला. यामध्ये हे दोघे भाऊ-बहिण ठार झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com