Accident: धुळे-सुरत महामार्गावर भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

Accident: धुळे-सुरत महामार्गावर भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातील धुळे-सुरत महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. (accident News ST Mahamandal Bus And Truck Accident Surat Highway )

नंदुरबार जिल्ह्यातील धुळे-सुरत महामार्गावरील विसरवाडी गावाजवळ शेरे पंजाब हॉटेलसमोर हा अपघात झाला. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या भीषण अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे.Accident

मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर आगाराची नवापूर-नाशिक बस सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नवापूरहून प्रवाशांना घेऊन नाशिकला जाण्यासाठी निघाली. विसरवाडी गावाच्या पुढे महामार्गावर शेरे पंजाब हॉटेल समोर आल्यावर धुळ्याहून नवापूरच्या दिशेने समोरुन येणाऱ्या ट्रकने बसला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. Accident

या अपघातात ट्रक चालक प्रकाश यांचा मृत्यू झाला. प्रकाश हे तमिळनाडूचे रहिवाशी आहे. अपघातात बसमधील सुमारे 10-12 प्रवासी जखमी झाले आहेत.

विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात बसमधील प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी रुग्णांवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. काही गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. Accident

तसेच अपघात पाहण्यासाठी महामार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.

टॅग्स :accident