बॅंकेत रांगेत थांबलेला ज्येष्ठ खातेदार कोसळला 

bank
bank

केडगाव - केडगाव (ता. दौंड) येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे काढण्यासाठी रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागल्याने शंकर गायकवाड हे ज्येष्ठ नागरिक चक्कर येऊन पडले. ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. 

या बॅंकेत पैसे काढणे आणि भरण्यासाठी एकच काउंटर असल्याने ग्राहकांना जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागते. ते ज्येष्ठ नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. पैसे भरणे आणि काढण्यासाठी दोन काउंटर करावेत, अशी खातेदारांची मागणी आहे. 

केडगाव येथे बॅंक ऑफ महाराष्ट्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, पुणे पीपल्स या बॅंका आहेत. या सर्वच बॅंका पहिल्या मजल्यावर आहेत. ज्येष्ठ नागरिकांची पहिला मजला चढतानाच दमछाक होते. बॅंकेत गेल्यानंतर रांगेत उभे राहण्याचा त्रास ठरलेला. यातूनच आजचा प्रकार घडला आहे. बॅंकांनी तळमजल्यावर आपल्या बॅंका सुरू कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे. 

केडगावमध्ये जागेचे दर खूप असल्याने बॅंका पहिल्या मजल्यावर भाडे कमी असते म्हणून तेथे कार्यालय सुरू करतात. पण, खातेदारांचा, ज्येष्ठांचा बॅंकांनी विचार करण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com