बालेवाडी भुखंड प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

पुणे : बालेवाडी विभागातील भुखंड प्रकरणात गैरकारभार केल्याचा गंभीर आरोप माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे.  

पुणे : बालेवाडी विभागातील भुखंड प्रकरणात गैरकारभार केल्याचा गंभीर आरोप माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे. याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. 

ही बाब महिला अधिकाऱ्यांने महसूलमंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत शिवप्रिया रिटेलर्स या बांधकाम व्यवसायातील कंपनीला 300 कोटी रुपयांचा लाभ होईल अशा प्रकाराचा निर्णय पाटील यांनी घेतल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.  

यावर बोलताना पाटील यांनी हा मुद्दा अर्धन्यायिक असल्याचे सांगितले. कोणत्याही अर्धन्यायिक विषयाला विधानसभेत आव्हान देता येत नाही. त्यासाठी संबधित न्यायालयात आव्हान देवू शकतात असे स्पष्टीकरण महसूल मंत्री पाटील यांनी दिले. 
 
यासंदर्भातील सर्व चर्चा सभागृहाच्या पटलावरून काढण्याची मागणी करण्यात आली. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ राठोड यांनी तपासून पाहून निर्णय घेतो असे आश्वासन दिल्याने चंद्रकांत पाटील संतापले. मात्र, त्यानंतर त्यांच्यावरील आरोप विधानसभा अध्यक्षांनी पटलावरून काढून टाकले. यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त करत सभात्याग केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused of Chandrakant Patil in Balewadi Bhumi case