कालव्यातून पाणी घेणाऱ्यांवर कारवाई

कालव्यातून पाणी घेणाऱ्यांवर कारवाई

आळेफाटा - पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी पारनेर तालुक्‍यात योग्य दाबाने पोहोचत नसल्याने, जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात मंगळवारी (ता. २०) पाणीउपसा करणाऱ्या विद्युत पंपांवर कुकडी पाटबंधारे विभागाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात कारवाई केली.  

      
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव जोगे धरणाचे आवर्तन विशेष फायदेशीर ठरणार आहे. गेल्या २५ ऑक्‍टोबरपासून आवर्तन सोडण्यात आले आहे. जुन्नर व पारनेर तालुक्‍यातील काही भाग या कालव्याच्या लाभक्षेत्रात येतो. मात्र, तीव्र टंचाईमुळे जुन्नर व पारनेर तालुक्‍यात पाण्यावरून मध्यंतरी वाद निर्माण झाला होता. अखेर कुकडी पाटबंधारे विभागाने गेल्या आठवड्यात कालव्याचे पाणी पोलिस बंदोबस्तात पारनेर तालुक्‍यातील वडझिरे तलावात सोडले. पिंपळगाव जोगे धरणाच्या लाभक्षेत्रातील जुन्नर तालुक्‍यातील  काही गावांना अद्यापपर्यंत पाणी मिळालेले नसल्याने संबंधित शेतकरीवर्गात तीव्र नाराजी आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्‍यात पुरेशा दाबाने पाणी पोचत नसल्याने मंगळवारी पिंपरी पेंढार ते बेल्हे-रानमळादरम्यान कुकडी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मिलिंद बागूल, शाखा अभियंता अनिल बेल्हेकर व कर्मचाऱ्यांनी दंगल नियंत्रण पथकासह पाणी उपसा करणाऱ्या पंपांवर कारवाई केली. या वेळी संबंधित अधिकारी व काही शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी झाली. कालव्यातून विद्युतपंपांच्या साहाय्याने पाणी उपसा करू नये, अशी सक्त ताकीद संबंधितांना देण्यात येत आहे. 

दरम्यान, टेल टू हेड पद्धतीनुसार पारनेर तालुक्‍यानंतर जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com