वृक्ष लागवडीचे थोतांड; सयाजी शिंदे यांची सरकारवर टीका

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

मंत्र्यांनाच झाडांची माहिती नाही

वृक्षांमध्ये 200 हून अधिक जाती आहेत. शाळांच्या प्रत्येक अंगणात गुलमोहर, उंच झाडे दिसतील. दरवर्षी त्याच खड्ड्यात जाऊन झाडे लावली जात आहेत. मंत्री, अधिकाऱ्यांना वृक्षांच्या जातीची माहिती नाही. कोणते झाड लावले पाहिजे, याची माहिती नाही.

मुंबई : महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हे केवळ नाटक असून, 5 कोटींची वृक्ष लागवड हे एकप्रकारे थोतांडच आहे, अशा शब्दांत अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच वृक्ष लागवडीवरुन भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. एकाच खड्ड्यात वृक्ष लागवड केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला. त्यांच्या या निर्धारावर सयाजी शिंदे यांनी टीका केली. ते म्हणाले, की मुनगंटीवार ठराविक ग्रामपंचायती झाडे लावण्याचा उपक्रम करत आहेत. 3,300 झाडे किती ग्रामपंचायतींनी लावली? त्यांनी 33 कोटी झाडे लावण्याचा निर्धार केला. इतकी वृक्ष लावल्यावर जपणार कुठे? तसेच त्यासाठी पाणी आणणार कुठून?, असा सवालही शिंदे यांनी यावेळी केला. 

दरम्यान, दरवर्षी लावलेल्या झाडांचे, त्याला जगवण्यासाठी आलेल्या खर्चाचा हिशोब द्यावा, अशी मागणीही सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारला केली. 

मंत्र्यांनाच झाडांची माहिती नाही

वृक्षांमध्ये 200 हून अधिक जाती आहेत. शाळांच्या प्रत्येक अंगणात गुलमोहर, उंच झाडे दिसतील. दरवर्षी त्याच खड्ड्यात जाऊन झाडे लावली जात आहेत. मंत्री, अधिकाऱ्यांना वृक्षांच्या जातीची माहिती नाही. कोणते झाड लावले पाहिजे, याची माहिती नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Sayaji Shinde Criticizes Fadnavis Government on Plantation