'शिवाजी महाराजांचा जन्म क्षुद्र जातीत'; अभिनेत्रीचे वादग्रस्त ट्विट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करत हे वादग्रस्त विधान केले आहे. तिच्या या पोस्टनंतर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म क्षुद्र जातीमध्ये झाला आहे, असे वादग्रस्त ट्विट अभिनेत्री पायल रोहतगीने केले आहे. तिच्या या ट्विटनंतर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.

पायलने ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करत हे वादग्रस्त विधान केले आहे. तिच्या या पोस्टनंतर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. ट्विटरसोबतच तिने इन्स्टाग्रामवरही ही पोस्ट शेअर केली आहे. तिने पोस्टमध्ये अकलीचे तारे तोडताना म्हटले आहे की, 'छत्रपती शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म क्षुद्र जातीत झाला होता...'

पायलने इन्स्टाग्रामवर पती संग्राम सिंगसोबतचे एक छायाचित्र शेअर करताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शिवाय, महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिले? असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे. तिच्या या वक्तव्यावरुन तिने थेट मराठा आरक्षण आणि शिवाजी महाराज यांच्याबाबत मुक्ताफळे उधळली आहेत.

दरम्यान, अभिनेत्री पायल रोहतगी हिने अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. काही दिवसांपूर्वी राजा राममोहन रॉय यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावेळी तिने थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कमल हासन यांच्यावरही टीका केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress payal rohatgi reaction shivaji maharaj and maratha reservation