भाजपमध्ये आज शिवाजी महाराजांचे अन् फुलेंचे प्रत्यक्ष वशंज- मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशामुळे अनेकांना धक्का बसला असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, शाहू महाराज घराण्याचे वंशज छत्रपती संभाजी राजे आधीच भाजपमध्ये आहेत. आणि आज प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भाजपमध्ये दाखल झाले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांचं आज स्वागत केलं. शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशामुळे अनेकांना धक्का बसला असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, शाहू महाराज घराण्याचे वंशज छत्रपती संभाजी राजे आधीच भाजपमध्ये आहेत. आणि आज प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भाजपमध्ये दाखल झाले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच, मंदाताई आणि चित्राताई या महिला नेत्या भाजपमध्ये आल्यानं भाजपमधील महिला संघटन आता आणखी मजबूत होईल. चित्राताईंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पवारासाहेबांना त्यांच्यावर बोलावं लागलं. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व काय असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले महाराष्ट्रात झाले नसते तर महाराष्ट्र कधीच पुरोगामी झाला नसता. त्यांच्या वंशज नीता होले यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांचे अन् फुलेंचे प्रत्यक्ष वशंज भाजपमध्ये आले असल्याचे म्हटले.  

दरम्यान, मधुकर पिचड आणि कालिदास कोळंबकरांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याचा उल्लेख करत त्यांनी माझ्या पाठीमागे राहून मोठी ताकद उभी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actual descendants of Shivaji Maharaj and Mahatma Phule came to BJP today says Devendra Fadnavis