
Adani Row : ‘नरेंद्र मोदी डरते हैं…पोलीस को आगे करता है’, घोषणा देत NSE स्टॉक एक्स्चेंजच्या बाहेर आंदोलन
Adani Row : महाराष्ट्रातील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) बाहेर उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात आंदोलन केल्याबद्दल काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचे अनेक फोटो वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले असून त्यात नेते बसमध्ये बसलेले दिसत आहेत.
या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये पोलीस जमिनीवर पडलेल्या काँग्रेस नेत्याला उचलून बसमध्ये बसवताना दिसत आहेत. (Mumbai Congress leaders protesting over Adani-Hindenburg row outside NSE detained)
जेव्हापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानीबद्दल अनेक विधाने केली आहेत आणि पंतप्रधान मोदी आणि अदानी एक असल्याचे म्हटले आहे, तेव्हापासून काँग्रेस अदानी समूहाला घेराव घालत आहे. काँग्रेस नेत्याने पीएम मोदी आणि अदानी समूहाबाबतही अनेक दावे केले आहेत.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बाहेर घोषणा :
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी अदानी ग्रुप आणि पीएम मोदींवर टीका करत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत. याच भागात बुधवारी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या बाहेर पीएम मोदी आणि अदानी समूहाविरोधात निदर्शने करण्यात आली.
यावेळी पीएम मोदींबद्दलही घोषणाबाजी करण्यात आली आणि ‘अदानी मोदी भाई भाई...’ असे म्हटले गेले. एवढेच नाही तर काँग्रेस नेत्यांनी ‘नरेंद्र मोदी डरते हैं…पोलीस को आगे करता है’ अशा घोषणाही दिल्या.
अशा स्थितीत हे आंदोलन रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तेथे आंदोलन करणाऱ्या सर्व काँग्रेस नेत्यांना हटवून ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) विरोधात आंदोलन करण्यात आले.
अदानी समुहाने जो आर्थिक घोटाळा आणि भ्रष्टाचार केलेला आहे त्यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजने त्यांना मदत केलेली आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आले आहे.