शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार; मंत्रिमंडळाचा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसै जमा करणार असून आज (ता.12) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई- सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसै जमा करणार असून आज (ता.12) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरुपात वाढ करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारीच्या आत पैसे जमा करण्याचा निर्देशही देण्यात आले आहेत. यातील पहिल्या टप्प्यात 2900 कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्यात 2000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

त्याचबबरोर, पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात 349 फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात दुर्गम भागात 80 चिकित्सालये स्थापन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनी फ्री होल्ड करण्यास मान्यताही या बैठकीत दिली आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. तसेच, राज्यातील सहकारी सुतगिरण्यांना अर्थसहाय्य करण्याच्या आकृतीबंधात 05:45:50 याप्रमाणे सुधारणा करण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर, सेवानिवृत्त तालुका निरीक्षक भूमी अभिलेख बाबुराव नानासाहेब आर्दड यांना लाचलुचपत प्रकरणी उच्च न्यायालयाने दोषी ठरविल्याच्या दिनांकापासून त्यांचे संपूर्ण सेवानिवृत्तीवेतन काढून घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, पुण्यातील स्पाईसर एडव्हान्टीस युनिव्हर्सिटी संदर्भातील अधिनियमात सुधारणा करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

Web Title: Additional funding of Rs 2 thousand crore to help the drought victims