होळीसाठी एसटीच्या जादा बस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई - होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी नियमित एसटी बसव्यतिरिक्त 100 जादा बस सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला- नेहरूनगर या आगारांतून या बस सुटतील. 

मुंबई सेंट्रल येथून दापोली, गुहागर, देवरूख, खेड, कासे-पेडांबे, शेवते, बुरुंबेवाडी, मेढे व पिंपळोली येथे जाणाऱ्या बस सुटतील. परळ येथून खेड- दापोली, आंजर्ले, भातगाव येथे जाणाऱ्या बस रवाना होतील. कुर्ला-नेहरूनगर आगारातून गुहागर, चिपळूण व दापोलीसाठी बस सुटतील. याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा या भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी या आगारांतून 10 व 11 मार्चला 50 जादा बस सोडण्यात येतील, अशी माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Additional ST bus for Holi