esakal | ...म्हणून आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना

- शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे दिल्लीला जाण्यासाठी रवाना.

...म्हणून आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ते भेट घेणार असून, उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांना आमंत्रण देणार असल्याचे सांगितले जात आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकासआघाडी सरकारचा शपथविधी सोहळा उद्या शिवतीर्थ येथे होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी एकमताने निश्चित झाले आहे. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देणार आहेत.

'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्या फडणवीसांकडे भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

दरम्यान, राज्यातील महाविकासआघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक काही मिनिटांपूर्वी पार पडली. या बैठकीनंतर लगेचच आदित्य ठाकरे दिल्लीला जाण्यासाठी विशेष विमानाने रवाना झाले आहेत. आता ते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.