आदित्य ठाकरेंनी दिल्या स्वसंरक्षणाच्या 'टिप्स' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

नाशिक : दैनंदिन कामे करताना आपल्याला कुणी "फॉलो' करते का? करत असल्यास सजग राहा. घटना सांगून घडत नाही, त्यामुळे समोरून हल्ला झाल्यास किंवा हल्लेखोर मागून आल्यास काय कराल? प्रतिहल्ला नेमका कोणत्या क्षणी करायचा, तो करताना कशाला लक्ष्य करायचे? अशा शब्दांत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज स्वसंरक्षणासंदर्भात विद्यार्थिनींशी संवाद साधला. 

मुलींनी पुढे होत हल्लेखोराचे डोळे, नाक, तोंडावर हल्ला करायचा, हल्लेखोराच्या हातात महिलांनी त्यांचे केस जाऊ द्यायचे नाहीत, त्यामुळे प्रतिकाराची धार बोथट होते, असा सल्लाही आदित्य यांनी या वेळी दिला. विद्यार्थिनींनीही त्यांना अनेक प्रश्‍न विचारले. सरतेशेवटी सेल्फी घेत आदित्य यांनी विद्यार्थिनींचा निरोप घेतला. 
येथील सायखेडा रोडवरील आढावनगर भागातील क्रीडासंकुलाच्या उद्‌घाटनप्रसंगी येथे आलेल्या आदित्य यांनी औपचारिक भाषणबाजीला फाटा देत जमलेल्या विविध शाळांमधील मुलींशी संवाद साधत त्यांना स्वसंरक्षणाच्या टिप्स दिल्या.

शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांच्या पारंपरिक उद्‌घाटनांच्या कार्यक्रमांना बगल देणारा असाच हा कार्यक्रम ठरला. 
 
Web Title: Aditya Thackeray gives self defense tips