Vidhan Sabha 2019 : ठाकरे घराण्यातून उमेदवार ठरला; आदित्य भरणार अर्ज!

टीम ई-सकाळ
रविवार, 29 सप्टेंबर 2019

आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु होती. त्यानंतर आता ते वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई : शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. येत्या 2 ऑक्टोबरला आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.

आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु होती. त्यानंतर आता ते वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृतपणे माहिती शिवसेना किंवा सेनेच्या इतर नेत्यांनी देण्यात आली नाही. 

Vidhan Sabha 2019 : आता 'या' तारखेला होणार नारायण राणेंचा भाजपप्रवेश

दरम्यान, विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, त्याबाबत कोणतीही माहिती दिली जात नव्हती. त्यानंतर आता ही माहिती समोर आली आहे.  

Vidhan Sabha 2019 : मनसेच ठरलं! राज ठाकरे उतरणार मैदानात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray may Contest Assembly Election From Worli Constituency