Aditya Thackeray Net Worth : बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाकडे आहे एवढ्या कोटींची संपत्ती l Aditya Thackeray Net Worth uddhav balasaheb thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray Net Worth

Aditya Thackeray Net Worth : बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाकडे आहे एवढ्या कोटींची संपत्ती

Aditya Thackeray Net Worth : आदित्य हे ठाकरे कुटुंबातला पहिला व्यक्ती आहे ज्याने निवडणुक अर्ज भरला होता. त्यामुळे त्यांची एकुण संपत्ती यामुळे समोर आली. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांनी मुंबई वरळी जागेसाठी अर्ज भरला होता. त्यांच्याकडे एकूण १६ कोटींची संपत्ती आहे. सविस्तर जाणून घ्या.

एवढी आहे जंगम संपत्ती

आदित्य ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती दिली आहे की, त्यांच्याकडे ३० हजार रुपये कॅश आहेत. १० कोटी ३६ लाख १५ हजार २१८ रुपये बँकेत जमा आहेत. आदित्य यांची गुंतवणुक साधारण २० लाख रुपये आहे. त्यांच्याकडे एक BMW कार आहे. ज्याची किंमत साडे सहा लाख आहे. याशिवाय आदित्यकडे ६४ लाख ६४ हजार रुपयांची ज्वेलरी आहे. १० लाख २२ हजार रुपयांची इतर संपत्ती आहे. अशा प्रकारे आदित्यकडे ११ कोटी ३८ लाख ५ हजार २५८ रुपयांची जंगम संपत्ती आहे.

न लोन, न कोणतीही क्राइम केस

स्थायी संपत्तीचा विचार केला तर एकूण ४ कोटी ६७ हजार ९१४ रुपयांची संपत्ती आहे. आदित्यने आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर कोणतेही लोन नाही. आणि कोणतीही क्राइम केस पण नाही.