
"राज्यपालांनी असे निघून जाणं लाजीरवाणी गोष्ट असून हा महाराष्ट्राचा अपमान"
महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये विरोधकांची घोषणाबाजी आणि गोंधळ पाहायला मिळाला. विरोधकांची ही घोषणाबाजी पाहून थेट राज्यपाल सभागृहातून निघून गेले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) असे निघून गेल्याने आणखी वाद होण्याची शक्यता आहे. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा: नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक; विधानभवनाबाहेर घोषणाबाजी
आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. संपुर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यपाल असे निघून जाणं आणि त्यांच्या भाषणाच्या वेळी त्यांचा असा अपमान होणं, या दोन्ही गोष्टी खुपचं अयोग्य आहे. आम्हाला धक्का बसलाय की असं होऊ कसं शकतं” (Aditya Thackeray News)
हेही वाचा: राज्यपाल आले नि लगेच निघाले; विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; वाचा घटनाक्रम
आज अधिवेशनामध्ये राज्यपालांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. या घोषणाबाजी पाहुन त्यांनी आपलं भाषण अर्ध्यावरच थांबवलं आणि ते निघून गेले.
Web Title: Aditya Thackeray Reacted On Governor Bhagat Singh Koshyari Left From Convention
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..