यशवंत जाधवांच्या डायरीतील 'मातोश्री'वर आदित्य ठाकरेंची तीन वाक्यात प्रतिक्रिया

Aditya Thackeray on Yashwant Jadhav Diary
Aditya Thackeray on Yashwant Jadhav Diarysakal media

Aditya Thackeray on Yashwant Jadhav Diary: शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav Diary) यांच्या घरातून आयकर विभागाला (Income Tax) एक डायरी सापडली. यामधून 'मातोश्री'ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचं घड्याळ दिल्याचं समोर आलं होतं. त्याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते राजापूर दौऱ्यावर असताना पत्रकारांसोबत बोलत होते.

Aditya Thackeray on Yashwant Jadhav Diary
'उत्तर'साठी 'मातोश्री'वरून हलली सूत्रं; अस्लम सय्यद यांची माघार

काही लोकांनी पसरवलेल्या अफवांच्या बातम्या केल्या जातात. आपण अफवांवर किती विश्वास ठेवायचा. कुठल्याही अफवेवरून मी प्रतिक्रिया देणार नाही, असं मोजकं वक्तव्य करत आदित्य ठाकरेंनी या प्रकरणावर अधिक भाष्य करण्याचं टाळलं.

नेमकं प्रकरण काय? -

मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. आयकर विभागाकडून जवळपास पाच दिवस चौकशी सुरू होती. २०१८ ते २०२२ यशवंत जाधव स्थायी समितीचा कार्यभार पाहात होते. यातील दोन वर्षांच्या काळात त्यांनी १००० सदनिका आणि ३६ इमारतींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला. आयकर विभागाने जाधवांच्या घरातून काही वस्तू जप्त करण्यात आल्या. तसेच काही कागदपत्रं देखील आयकर विभागाच्या हाती लागले. एक डायरी देखील आयकर विभागाच्या हाती लागली होती. यामध्ये 'मातोश्री'ला २ कोटी रुपये आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख होता. त्यामुळे हे 'मातोश्री' कोण? असा सवाल विचारला जात होता.

दरम्यान, यशवंत जाधव यांना मातोश्रीबद्दल प्रश्न विचारला असता या मातोश्री म्हणजे माझी आई आहे. आईला दानधर्म करण्यासाठी पैसे दिले होते, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. त्यानंतर विरोधकांनी शिवसेनेवर कडाकडून टीका केली. आजकाल लोक स्वतःच्या आईला मातोश्री म्हणतात, अशी टीप्पणी विरोधकांकडून करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com