
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 01 ऑगस्टपासून विकास यात्रा काढणार आहेत. पण त्याआधीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून 'जन आशीर्वाद यात्रे'ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांची ही यात्रा शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 01 ऑगस्टपासून विकास यात्रा काढणार आहेत. पण त्याआधीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून 'जन आशीर्वाद यात्रे'ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांची ही यात्रा शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण निर्मिती करुन पाच वर्षातील कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जाणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची विकास यात्रा सुरू होण्याआधीच आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करतील. येत्या शुक्रवारपासून या यात्रेला आरंभ होईल.
सध्या शिवसेना, भाजपमध्ये सगळं काही आलबेल असल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र तरीही शिवसेना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणाच्या मनस्थितीत नाही. 2014 मध्ये लोकसभा निवडणूक एकत्र लढणाऱ्या शिवसेना, भाजपाची युती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली होती. हा धोका टाळण्यासाठी शिवसेना कामाला लागली आहे.