Sheetal Mhatre Video : शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sheetal Mhatre

Sheetal Mhatre Video : शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या व्हिडिओ व्हायरल प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरील 'मातोश्री' नावाच्या पेजबाबत तक्रार केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. तर शिवसेनेच्या नेत्यांकडून या प्रकरणात ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान या व्हिडिओ व्हायरल प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय असलेल्या साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिस यासंबधी तपास करत आहेत. साईनाथ दुर्गे यांना विमानतावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी ही प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभर तपास सुरू केला आहे.

शीतल म्हात्रे व्हिडिओ व्हायरल प्रकरणी आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय असलेल्या साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांना मुंबई पोलिसांनी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. दुर्गे यांना मुंबई पोलिस यासंबधी सखोल तपास करत आहेत.

साईनाथ दुर्गे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. साईनाथ दुर्गे युवासेना सदस्य आहेत. शिवसेना युवासेना सोशल मीडियाची जबाबदारी साईनाथ दुर्गे यांच्यावर आहे

साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर आज विधीमंडळात देखील हा चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष दलाने त्यांना ताब्यात घेतलं आहे. हा व्हिडिओ कोणी बनवला? का बनवला हा व्हिडिओ खरा आहे की, मॉर्फ केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ कोणाच्या सांगण्यावरून बनवला आहे का याचा तपास पोलिस घेत आहेत. तर साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.