पुणे : राज्यातील सर्व आश्रम शाळा आणि होस्टेल्स यांच्यासाठी फुलेवाडा एज्युकेशन प्लॅन तयार करण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार असून, राज्यातील आश्रम शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी आज पुण्यात दिली.
राज्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गेल्या महिन्यात पुण्यात महात्मा जोतिबा फुले यांचे निवासस्थान असलेल्या फुलेवाड्यात समाज कल्याण विभागाची एक बैठक झाली होती. त्यात फुलेवाडा एज्युकेशन प्लॅन ठरविण्यात आला. त्यात आदिवासी विभागाच्या निवासी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबविण्यावर निर्णय झाला. सीबीएसई अभ्यासक्रमाबरोबरच शाळांमधील पायाभूत सुविधांचाही यात समावेश असल्याची माहिती आज, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज पुण्यात फुलेवाड्याला भेट देऊन सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. सुरुवातीला विभागीय पातळीवरील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि महात्मा जोतिबा फुले यांचे विचार यांची सांगड घालून, समाज कल्याण विभागाच्या शाळांमध्ये नवीन एज्युकेशन प्लॅन राबविण्यात येणार असल्याचं नारनवरे यांनी सांगितलं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.