"कृषी कायदे संसदेत मागे घेतले, तरच त्याला अर्थ" | प्रकाश आंबेडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prakash ambedkar

"कृषी कायदे संसदेत मागे घेतले, तरच त्याला अर्थ" | Farm Law repeal

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली असून वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. माझ्या सरकारनं शेतकरी हिताला प्राधान्य दिलं आहे. शेतकरी आंदोलनाला वर्ष होण्याआधी मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यामुळे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला आहे. मात्र असं असलं तरी दुसरीकडे मोदी सरकारच्या या निर्णयावर टीकाही करण्यात येत आहे. कृषी कायदे संसदेत मागे घेतले गेले तरच त्याला अर्थ आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

"कृषी कायदे संसदेत मागे घेतले, तरच त्याला अर्थ"

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी तीन कृषी कायदे (farm law repeal) परत घेण्याची घोषणा केली आहे. मात्र हे कायदे संसदेत मागे घेतले गेले तरच त्याला अर्थ आहे. दुसरे असे की याच विषयावर सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांची याचिका आहे. आमची विनंती आहे की 'कृषी' हा विषय केंद्राचा आहे की राज्याचा आहे या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निर्णय द्यावा. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कोण काय म्हणाले? | Farm Law Repeal

हेही वाचा: 'मी माझ्या बापाचे नाव लावतो'; विक्रम गोखले कुणाबाबत म्हणाले?

loading image
go to top