शिवसेना आमदारांना सबुरीचा सल्ला

shivsena
shivsena

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेनंतर खळबळ निर्माण झाल्याने आमदारांना विश्‍वासात घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. सत्तास्थापनेबाबत आमदारांना विश्‍वास दिला जाणार असून, शिवसेनेचाच मुख्यमंत्री येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याने सबुरीचा सल्ला उद्धव ठाकरे देणार आहेत. येत्या शुक्रवारी (ता. २२) दुपारी १२ वाजता ‘मातोश्री’वर ही बैठक होणार आहे.

शिवसेनेचे ५६ आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमदारांनी शेतकऱ्यांना कशा प्रकारची मदत केली, याबाबतचा आढावा उद्धव ठाकरे स्वत: घेणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सांगितले. तसेच, सत्तापेचावरही उद्धव ठाकरे आमदारांसोबत चर्चा करण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) शिवसेना बाहेर पडली आहे. शिवसेनेच्या राज्यसभा आणि लोकसभेतील दोन्ही सभागृहांतील खासदारांना विरोधी बाकांवर बसावे लागले आहे. त्यातच शरद पवारांच्या कालच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेनंतरही शिवसेनेमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या आमदारांना आमिषे दाखविण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असल्याने उद्धव ठाकरे स्वत: त्यांना शिवसेना सरकार स्थापन करीत असल्याची खात्री पटवून देणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com