Nana Patole : 'राज्यपाल माझे चांगले मित्र...', राज्यपालांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
Nana Patole
Nana PatoleEsakal

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्विकारला आहे. त्यांच्या जागी आता नव्या राज्यपालांची नियक्ती करण्यात आली आहे. (President Murmu accepts the resignation Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari Ramesh Bais has been appointed )

कोश्यारी यांच्या जागी रमेश बैंस यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर सर्व पक्षातील प्रतिक्रिया समोर येत आहेत. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर बोलताना म्हणाले की, भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून आधी बदनामी करून घेतली. आता त्यांचं काम झालं आहे.

Nana Patole
Bhagat Singh Koshyari : 'महाराष्ट्रातील घाण गेली…', विरोधी पक्षातील बड्या नेत्यांची जहरी टीका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेली वक्तव्ये आम्ही कधीही विसरू शकणार आहे. त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली आहे. त्यांची खुर्ची सत्तेत राहण्यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घेतला आहे. यामुळे राज्याच्या जनतेची ताकत समजली आहे.

Nana Patole
Supriya Sule : राज्याच्या राज्यपालपदी रमेश बैस; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ईडी सरकारकडून बऱ्याच दिवसांनी…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेचा अपमान केला. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. चुकीच काम केलं तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांचे कान धरू शकतात. तर आत्ता येणारे नवे राज्यपाल हे माझे मित्र आहेत. ते चांगल काम करतील अशी अपेक्षा आहे. ते यांच्यासोबत खासदार राहिले आहेत. ते चांगलं काम करत असतील तर काँग्रेस त्यांना नक्की साथ देईल. येत्या काही दिवसांत समजेल ते कसं काम करतात ते अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com