म्हैशीच्या अपघातामुळे चर्चेत आलेली वंदे भारत एक्सप्रेस सुरक्षित आहे का? प्रवासी काय म्हणतात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हैशीच्या अपघातामुळे चर्चेत आलेली वंदे भारत एक्सप्रेस सुरक्षित आहे का? प्रवासी काय म्हणतात?

म्हैशीच्या अपघातामुळे चर्चेत आलेली वंदे भारत एक्सप्रेस सुरक्षित आहे का? प्रवासी काय म्हणतात?

‘मेक इन इंडिया’तून तयार झालेल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'मध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर अशी एक्स्प्रेस सेवा 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. या रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी अत्यंत समाधानकारक प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी Excellent अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आता 8 तासात पोहोचते. त्यामुळे मेक इन इंडिया असलेल्या ट्रेनचा खूप फायदा झाला. मुंबईसाठी अशा अनेक ट्रेन सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

या रेल्वेसाठी मुंबई-अहमदाबाद चेअर कारसाठी (सीसी) एक हजार 385 रुपये आणि एक्झिकेटिव्ह कारसाठी (ईसी) दोन हजार 505 रुपये असे तिकीट दर आहेत. आठवड्यातील सहा दिवस ही रेल्वे धावणार आहे. तर दर रविवारी देखभालीच्या कारणास्तव ती बंद असेल.

ही रेल्वे मुंबई सेंट्रलवरून सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी रवाना होईल आणि गांधीनगर येथे दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल. गांधीनगरवरून परत दुपारी 2 वाजून 05 मिनिटांनी सुरू होऊन रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल.

या रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी ही रेल्वे सुरक्षित आणि आरामदायी असल्याचे सांगितले आहे. म्हैशीच्या अपघातामुळे ही रेल्वे सुरक्षित आहे की नाही याबद्दलचा संभ्रम आता दूर झाला आहे.