अजून किती पूल कोसळण्याची वाट पाहणार?

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 मार्च 2019

गेल्या काही महिन्यांपासून पादचारी पुलांच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी एलफिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये सुमारे 22 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता सीएसटीजवळचा पादचारी पूल कोसळला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, सुमारे 23 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे अजून किती पूल कोसळण्याची वाट पाहणार?, असा सवाल सर्वसामान्यांमधून केला जात आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून पादचारी पुलांच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी एलफिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये सुमारे 22 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता सीएसटीजवळचा पादचारी पूल कोसळला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, सुमारे 23 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे अजून किती पूल कोसळण्याची वाट पाहणार?, असा सवाल सर्वसामान्यांमधून केला जात आहे.

सीएसटीजवळचा पादचारी पूल धोकादायक असल्याचे पत्र सुमारे चार वर्षांपूर्वी प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. यापूर्वी एलफिन्स्टन येथे पादचारी पुलावर मोठी चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर अंधेरीतील गोखले पुलाचा स्लॅब रेल्वे ट्रॅकवरच कोसळला होता. 

दरम्यान, पूल कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, जेव्हा-जेव्हा अशाप्रकारच्या घटना घडतात, तेव्हा-तेव्हा स्थानिकांकडून रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: After Elphinstone bridge incident Mumbai faced another horrific foot over bridge collapse