चार दिवस उलटूनही जवानावर अंत्यसंस्कार नाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

कारंजा लाड (जि. वाशिम) : सीमा सुरक्षा दलातील जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर चार दिवस उलटूनही अंतिम संस्कार पार पडले नाहीत. अमरावतीच्या शवागारात पार्थिव ठेवण्यात आले असून, प्रशासनाकडून, तसेच लोकप्रतिनिधींकडून धोपे कुटुंबीयांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, याप्रकरणी घातपात झाल्याचा आरोप करीत, शवविच्छेदन अहवाल मिळेपर्यंत अंतिम संस्कार न करण्याच्या निर्णयावर धोपे कुटुंबीय ठाम आहेत. यावर तोडगा न निघाल्यास पोलिस बंदोबस्तात अंतिम संस्कार करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जाण्याची शक्‍यता आहे. 

जवान सुनील धोपे यांच्या मृत्यू प्रकरणाने कारंजा लाड शहर, तसेच जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. धोपे यांचा घातपात झाल्याची तक्रार कुटुंबीयांकडून पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. कारंजा शहर व जिल्ह्यात याप्रकरणी बंददेखील पाळण्यात आला आहे. "बीएसएफ"च्या वतीने याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशी अधिकारी शहरात दाखल झाले आहेत. परंतु, चार दिवस उलटूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार न झाल्यामुळे प्रशासनापुढील पेच वाढला आहे. धोपे कुटुंबीयांची मनधरणी करण्याचे सर्व प्रयत्न संपले आहेत. पोलिस बंदोबस्तात जवान धोपे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जाऊ शकतो, अशी शक्‍यता आहे. 

Web Title: after four days Jawan did not have funeral