बातमी मागची बातमी! बंगल्यातील कामानिमित्त गेल्यानंतर झाली अविवाहित महिलेशी ओळख अन्‌ पुढे त्याने सीसीटिव्ही बंद करुन केले...

तात्या लांडगे
Thursday, 2 July 2020

घरात गेल्यानंतर 20 मिनिटांनी कॅमेरे बंद 
आरोपी सैफअली शेख हा 27 जून रोजी रात्री साडेसातच्या सुमारास वॉल कंपाउंडवरुन उडी मारुन नागदेवी स्वामी यांच्या बंगल्यात शिरला. त्यानंतर त्याने बंगल्याचा मागील दरवाजा ठोठावला, मात्र तो उघडला नसल्याने मुख्य दरवाजातून बंगल्यात गेला. त्यानंतर तो काहीवेळाने बंगल्यातून बाहेर पडल्याचे सीसीटिव्ही कॅमेऱ्यातून स्पष्ट झाले आहे. मात्र, तो जेव्हा बाहेर पडला, त्यानंतर सीसीटिव्ही कॅमेरे बंद पडले. त्याने बंगल्यातून घराबाहेर पडताना कॅमेरे बंद केल्याचेही पोलिस तपासांत समोर आहे. आरोपीकडून आणखी पुढील तपास सुरु आल्याचेही पोलिस निरीक्षक श्री. शेडगे म्हणाले. 

सोलापूर : शहरातील मोहिते नगर परिसरातील कैकशा अर्पाटमेंट राहणारा आरोपी सैफअली अशरफ शेख याने किरकोळ कारणावरुन महिलेचा खून केल्याचे कबूल केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली असून पोलिस आता पुढील तपास करीत आहेत. 

सैफअली हा विवाहित असून तो बांधकामाची किरकोळ कामे करणारा मजूर. वडील कैकशा अर्पाटमेंटमध्ये वॉचमन म्हणून कामाला आहेत. अर्पाटमेंटच्या जवळच असलेल्या बंगल्यात नागदेवी स्वामी (वय-45) ही अविवाहित महिला एकटी राहत होती. टाकी स्वच्छ करणे, बांधकामाची किरकोळ कामे करताना त्याची त्या महिलेशी ओळख झाली. त्यानंतर त्याचे त्याठिकाणी येणे-जाणे वाढले. त्यातून दोघांमध्ये वैयक्‍तिक संबंध निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, 27 जून रोजी किरकोळ कारणावरुन दोघांमध्ये भांडण झाले आणि त्याने महिलेचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर तो महिलेचा मोबाइल घेऊन तिथून थेट सासरवाडीला (कलबुर्गी) पसार झाला. तत्पूर्वी, त्याने त्या महिलेच्या घरातील सीसीटिव्ही कॅमेरे बंद केल्याचेही तपासात समोर आले आहे, अशी माहिती विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

घरात गेल्यानंतर 20 मिनिटांनी कॅमेरे बंद 
आरोपी सैफअली शेख हा 27 जून रोजी रात्री साडेसातच्या सुमारास वॉल कंपाउंडवरुन उडी मारुन नागदेवी स्वामी यांच्या बंगल्यात शिरला. त्यानंतर त्याने बंगल्याचा मागील दरवाजा ठोठावला, मात्र तो उघडला नसल्याने मुख्य दरवाजातून बंगल्यात गेला. त्यानंतर तो काहीवेळाने बंगल्यातून बाहेर पडल्याचे सीसीटिव्ही कॅमेऱ्यातून स्पष्ट झाले आहे. मात्र, तो जेव्हा बाहेर पडला, त्यानंतर सीसीटिव्ही कॅमेरे बंद पडले. त्याने बंगल्यातून घराबाहेर पडताना कॅमेरे बंद केल्याचेही पोलिस तपासांत समोर आहे. आरोपीकडून आणखी पुढील तपास सुरु आल्याचेही पोलिस निरीक्षक श्री. शेडगे म्हणाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After going to work in the bungalow he met an unmarried woman