Election Results : लोकसभेच्या निकालानंतर नवनिर्वाचित खासदार श्रद्धास्थानांच्या दर्शनाला

Election Results : लोकसभेच्या निकालानंतर नवनिर्वाचित खासदार श्रद्धास्थानांच्या दर्शनाला

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नवनिर्वाचित खासदार श्रद्धास्थानांच्या दर्शनाला गेले आहेत. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पहिल्यांदा पुष्पहार अर्पण करून त्यांनी सुरवात केली. तर, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी भेट देऊन दर्शन घेतले.
 

सातारा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणूक निकाल पार पडल्यानंतर आज (ता.24) कराड व पाटण तालुका दौऱ्यादरम्यान आज कराड येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले व दत्त चौक येथे छत्रपती शिवरायांच्या स्मारकास अभिवादनही केले. 

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे नविर्वाचित खासदार राहुल शेवाळे यांनी खासदार म्हणून अधिकृत घोषणा झाल्यानंतर दादर चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन ते नतमस्तक झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com