दारू पिण्यासाठी वय स्पष्ट व्हावे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुंबई - दारू पिण्यासाठी नेमके वय किती असावे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. 

मुंबई - दारू पिण्यासाठी नेमके वय किती असावे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. 

कायद्यानुसार दारू पिण्याचे वय दोन गटांत ठरविण्यात आले आहेत. यानुसार एकविसाव्या वर्षी बिअर आणि पंचविसाव्या वर्षी मद्य पिण्याची मुभा आहे. मात्र वाइनबाबत कायद्यात स्पष्टता नाही. यासंदर्भात कायद्यानुसार पुरेसा खुलासा व्हायला हवा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी न्यायालयात केली आहे. दारू पिण्याबाबतचा कायदा 1972 पासून लागू झाला असून, त्यात आतापर्यंत अनेकदा दुरुस्ती करण्यात आली. त्यापैकी 2005 मध्येच तीन वेळा सुधारणा करण्यात आली होती. त्यानुसार वयाच्या एकविसाव्या वर्षी बिअर पिण्याची मुभा आहे, तर पंचविसाव्या वर्षी मद्य (हार्ड लिकर) पिण्याची परवानगी आहे. त्यामुळे दारू पिण्याबाबत वयोमर्यादेत पुरेशी स्पष्टता आणि कारणे असायला हवी, असे मत डॉ. मुंदडा यांनी व्यक्त केले आहे. 

Web Title: The age for drinking alcohol becomes clear