कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये सर्वेक्षण

Avdeshkumar-Mishra
Avdeshkumar-Mishra

पुणे - देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन, कर्ज आणि गुंतवणूक यांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणास १ जानेवारी २०१९ पासून प्रारंभ होणार आहे. यंदा पहिल्यांदाच टॅब आणि ॲपलिकेशनच्या माध्यमातून हे ऑनलाइन सर्व्हेक्षण होणार असून, अधिकाधिक बिनचूक माहिती (डाटा) यामुळे उपलब्ध होणार असल्याची माहिती नवी दिल्ली येथील नॅशनल सॅम्पल सर्व्हे कार्यालया (फिल्ड ऑपरेशन्स विभाग)चे उपमहासंचालक अवदेश कुमार मिश्रा यांनी दिली. 

केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी विभागातर्गंत दर दहा वर्षांनी सर्व्हेक्षण करण्यात येते. यंदा १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ मध्ये संपूर्ण वर्षभर शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन, कर्ज आणि गुंतवणूक यांचे सामाजिक-आर्थिक सर्व्हेक्षण केले जाणार आहे. या कालावधीत खरीप व रब्बी अशा दोन हंगामांकरिता दोन वेळेस सर्व्हेक्षण केले जाईल. यात हंगामनिहाय शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन, उत्पादन, हमीभाव आदी विषयांचाही अंतर्भाव आहे. 

यंदा पहिल्यांदाच जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन या तीन विषयांचे एकत्रित सर्व्हेक्षण होणार आहे. रिझर्व्ह बँक, देशाचे कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग, केंद्रीय पशुसंवर्धन, निती आयोग, विविध वित्तीय संस्था आदींना या माहितीचा उपयोग होतो. याद्वारे केंद्र सरकारच्या विविध योजना, धोरण, अनुदान, मदत आदी निश्‍चितीसाठी या सर्व्हेक्षणाचा उपयोग केला जात असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

सर्वेक्षणाचा उपयोग
 केंद्र सरकारच्या विविध विभागांना उपयुक्त माहिती
 विविध योजना, धोरणे रचना, विकासकामात उपयोग
 सरकारच्या अनुदान, मदत निश्‍चिती करण्यात उपयोग
 शेतकऱ्यांचा सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा

अशी होणार माहिती संकलन
 टॅब आणि ॲपलिकेशनद्वारे ‘डेटा एंट्री’
 वर्षात दोन वेळेस येणार सर्व्हेक्षक
 खरीप रब्बी हंगामातील माहिती घेणार
 जमीन, जनावरे, पीक, उत्पादन यांची माहिती 
 शेतीत होणाऱ्या अवजारे, निविष्ठांचा वापर

२०१९मधील सर्व्हेक्षण हे देश आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. सरकारच्या योजना, धोरणांमध्ये या माहितीचा उपयोग केला जातो. आपण दिलेली माहिती ही गोपनीय ठेवली जाते. एनएसएसओचे सर्व्हेक्षक शेतकऱ्यांपर्यंत येणार आहेत. त्यांना आवश्‍यक ती माहिती देऊन सहकार्य करावे.
- अवदेश कुमार मिश्रा, उपमहासंचालक, नॅशनल सॅम्पल सर्व्हे कार्यालय, नवी दिल्ली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com