‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

विरवडे (जि. सोलापूर) - ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सचिन भोसले यांच्या शेतात झाले. त्या वेळी (डावीकडून) ‘सकाळ, सोलापूर’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद
विरवडे (जि. सोलापूर) - ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सचिन भोसले यांच्या शेतात झाले. त्या वेळी (डावीकडून) ‘सकाळ, सोलापूर’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद

सोलापूर - ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शुक्रवारी विरवडे बुद्रुक (ता. मोहोळ) येथील प्रयोगशील शेतकरी सचिन भोसले यांच्या द्राक्षाच्या मळ्यात मोठ्या दिमाखात झाले. 

‘सकाळ’चे मुख्य संपादक-संचालक श्रीराम पवार, ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, सोलापूर ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, वितरण विभागाचे व्यवस्थापक दिनेश शेट्टी, पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे आनंद दंतकाळे, ‘ॲग्रोवन’चे मुख्य वितरण व्यवस्थापक चंद्रशेखर जोशी, ‘ॲग्रोवन’चे उपवृत्तसंपादक रमेश जाधव आदी उपस्थित होते.  यंदाच्या दिवाळी अंकाचे प्रेझेंटिंग स्पॉन्सर पु. ना. गाडगीळ आणि सन्स आहेत. 

पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या बाजूने लिहणं, बोलणं, त्यांचे प्रश्न मांडण्याचं काम ॲग्रोवन नित्य करतं. पण, सरकारी धोरणावर, निर्णयावर शेतकऱ्यांच्या बाजूने हस्तक्षेपही ॲग्रोवन करतं.’’

चव्हाण म्हणाले, ‘‘शेतीत पिकवण्यपेक्षा विकायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. यंदाचा दिवाळी अंक याच विषयाला केंद्रीभूत ठरवून करण्यात आला आहे. ’’
शेतकरी सचिन भोसले म्हणाले, ‘‘ॲग्रोवन’ आमचा खऱ्या अर्थाने गुरू आहे. उत्पादन असेल किंवा द्राक्षासह अन्य बाजारातील नवीन बदल, धोरणे याची माहिती ॲग्रोवन आमच्यापर्यंत पोचवते.’

ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही भारतीयांच्या जीवनाचा गाभा आहे. आमची संस्थाही ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली आहे. त्यामुळेच आम्ही ‘ॲग्रोवन’सारख्या ग्रामीण क्षेत्राशी नाते असलेल्या माध्यमाशी गेल्या तीन वर्षांपासून जोडलो आहोत.
- अमित मोडक, संचालक-सीईओ, पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com