नांदेडचे देशमुख दोन लाखांच्या हिऱ्याच्या दागिन्यांचे विजेते

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

‘अॅग्रोवन समृद्ध शेती’ बक्षीस योजना २०१८ ची सोडत जाहीर; १ हजार ७३८ बक्षिसांची लयलूट
पुणे - सकाळ अॅग्रोवनच्या `समृद्ध शेती बक्षीस योजना २०१८` च्या सोडतीमधील २ लाखांच्या हिऱ्याच्या दागिन्यांचे पहिले बंपर बक्षीस नांदेड येथील विनायकराव पंडितराव देशमुख यांना मिळाले आहे. सुमारे ३० लाखांहून अधिक रकमेच्या १ हजार ७३८ बक्षिसांची सोडत आज येथे प्रायोजकांच्या हस्ते काढण्यात आली. 

बक्षीस योजनेचे मुख्य प्रायोजक पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक, स्मार्टकेम टेक्नॉलॉजीजचे उपसरव्यवस्थापक सतीश नरतम, व्यवस्थापक रोहन तांबे, रोहित कृषी इंडस्ट्रिजचे व्यवस्थापक अनुप मोदी, अॅग्रोस्टारचे सहयोगी व्यवस्थापक केतन माणेक, विपणन विभागाचे उपसरव्यवस्थापक राकेश थडाणी, अॅन्डस्लाईटचे महाराष्ट्राचे मुख्य वितरक प्रकाश शिंदे उपस्थित होते. ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी प्रायोजकांचे स्वागत केले. दुसऱ्या बक्षिसाचे मानकरी (१ लाख ५० हजार किमतीचे पशूखाद्य निर्मिती यंत्र) देवराष्ट्रे येथील प्रमोद मोहन गावडे ठरले.

तिसऱ्या बक्षिसाचे विजेते (१ लाख किमतीचे हिऱ्यांचे दागिने) जाफ्राबाद येथील मिर्झा तौसिफ बेग फारूक बेग ठरले. सूत्रसंचालन अॅग्रोवनचे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक संभाजी घोरपडे यांनी केले. मुख्य व्यवस्थापक (वितरण) चंद्रशेखर जोशी यांनी आभार मानले. 
(सविस्तर बातमी आणि निकालासाठी आजचा ॲग्रोवन वाचा) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agrowon Samruddha Sheti Gift Scheme Draw