मंत्रिमंडळाच ठरलंयच अन् नगरचा पालकमंत्रीही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

पुणे : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाआघाडीच्या नुसत्या शक्यतेने अनेक पतंग उडू लागले आहेत. त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजित पवार हे उपमुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेचे अध्यक्ष अशी नावे चर्चेत आली आहेत. याशिवाय नगर जिल्ह्याचा पालकमंत्रीही सोशल मिडियात ठरवून टाकला आहे.

भाजपने सरकार बनवायला नकार दिल्यानंतर ही जबाबदारी आता शिवसेनेवर आली आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, यावर दोन्ही काँग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. मात्र त्याआधी संभाव्य मंत्र्यांच्या नावांनी सोशल मिडियात धुमाकूळ घातला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

यात नगर जिल्हा अग्रभागी आहे. भाजपची सत्ता आली असती तर राधाकृष्ण विखे पाटील हेच पालकमंत्री झाली असते. कारण या आधी पालकमंत्रीपद सांभाळणारे राम शिंदे यांचा पराभव रोहित पवार यांनी केला होता. आता शिवसेना महाआघाडीचे सरकार येणार असल्याची चर्चा सुरू जाल्याने साहजिकच नगरचा पालकमंत्री कोण होणार, यावर अनेकांनी आपापली मते व्यक्त केली आहेत. यात रोहित पवार यांच्या नावाची चर्चा स्वाभाविकपणे जोरात आहे.

तत्त्वांवर बोलल्या भाजपवासी चित्राताई अन् झाल्या ट्रोल!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे नगर जिल्ह्यातील नेते आहेत. काँग्रेस जर सत्तेत सहभागी झाली तर थोरात यांच्याकडे नगर जिल्ह्याचा कार्यभार येऊ शकतो. मात्र काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार असल्याची शक्यता असल्यास रोहित पवार हे नगरचे पालकमंत्री बनू शकतात.

काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा?; आजच अंतिम निर्णय

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कर्जत, राहुरी, पारनेर, अकोले, नगर, कोपरगाव असे सहा ठिकाणी आमदार आहेत. काँग्रेसचे दोन, भाजपचे तीन आणि एक अपक्ष आमदार आहे. यामुळे नगरचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे जाऊ शकते. रोहित यांना भविष्यातील नेता म्हणून प्रोजेक्ट करण्यासाठी ही चांगली संधी असल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशीही शक्यता नेटकरी व्यक्त करीत आहेत.

मातोश्रीचा निरोप घेऊन संजय राऊत दिल्लीला जाणार!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar district guardian minister of decided on social media