शिर्डी, कराड विमानतळांवर हवाई उड्डाण प्रशिक्षण

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई - महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने शिर्डी, धुळे, अमरावती व कराड या विमानतळांवर हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मान्यता दिली.

महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. या वेळी ते बोलत होते.

शिर्डी, धुळे, अमरावती व कराड या विमानतळांवरील पायाभूत सुविधांचा वापर या प्रशिक्षण संस्थांना देण्यासंदर्भात संचालक मंडळाने या वेळी मान्यता दिली. या संस्था खासगी सार्वजनिक सहभाग तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. मिहान प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना कंपन्यांमार्फत प्रशिक्षण देऊन नोकरीमध्ये सामावून घेण्याच्या प्रस्तावाला या वेळी मान्यता देण्यात आली.

प्रकल्पग्रस्तांना कंपन्यांमध्ये त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार कंपन्यांद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी येणारा खर्च हा प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर त्यांना कंपन्यांमध्ये सामावून घेतले जाईल, असे या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: Air flight training on shirdi karad airport