एअर इंडियाकडून गायकवाड यांचे तिकीट रद्द

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

नवी दिल्ली- शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचे एअर इंडियाने तिकीट आज (शुक्रवार) रद्द केले आहे. गायकवाड हे दिल्लीहून पुण्याला जाणार होते. शिवाय, गायकवाड यांच्या विमान प्रवासावर खासगी विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे.

खासदार गायकवाड हे आज दुपारी चार वाजता दिल्लीहून पुण्याला जाणार होते. शिवाय, आपण इअर इंडियाच्या विमानानेच पुण्याला जाणार असल्याचे म्हटले होते. परंतु, एअर इंडियाने त्यांचे विमान तिकीट रद्द केले आहे. गायकवाड यांनी एअर इंडियाविरोधात नागरी उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, गायकवाड हे गुरुवारी (ता. 23) पुण्याहून दिल्लीला येत होते. त्यांचे बिझनेस क्लासचे तिकीट होते, मात्र त्यांना इकॉनॉमिक क्लासमध्ये बसण्यास सांगितले. यावरुन त्यांची क्रू मेंबर सोबत वादावादी झाली होती. यानंतर गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केली होती.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने आपल्यासोबत गैरवर्तन केले, त्यामुळे त्याला मारले, असे स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले आहे. शिव्या ऐकून घ्यायच्या का? त्यामुळे मारहाण केली. मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, शिव्या ऐकून घ्यायला, असे गायकवाड यांनी म्हटले होते. शिवाय, माफी मागणार नसल्याचेही म्हटले आहे.

Web Title: Air India cancels ravindra gaikwad's return ticket