चंद्रपूर, मुंबईचा श्‍वास कोंडलेला

Air-Pollution
Air-Pollution

चंद्रपूर - अतिशय उष्ण असलेले चंद्रपूर आता प्रदूषणाच्या श्रेणीतही पुढे आहे. राज्यात चंद्रपूर आणि मुंबई हे प्रदूषणात अव्वल असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०१९च्या पाहणी अहवालात म्हटले आहे. 

शहरातील अनेक भागांतील प्रदूषणाने धोकादायक पातळी ओलांडली असल्यामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. यावर तातडीने उपयायोजना होणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २५ शहरांतील एकूण ७२ प्रदूषण मापन केंद्रांद्वारे १० हजार १६४ नमुन्यांचा अभ्यास करून २०१९ वर्षातील प्रदूषण अहवाल जाहीर केला आहे. यात बहुतेक सर्वच केंद्रांतून धूलिकण प्रदूषण वाढल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षीचे ६५ टक्‍के नमुने हे चांगल्या श्रेणीत, तर ३५ टक्के नमुने हे धोकादायक श्रेणीत आले आहेत. या अहवालात पुणे, चंद्रपूर, सायन, बांद्रा, डोंबविली अतिप्रदूषित असल्याचे म्हटले आहे. 

गेल्या आठ वर्षांपासून औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर, नाशिक, डोंबिवली, बांद्रा, ऐरोली, पुणे आणि सोलापूर येथे हवा प्रदूषण वाढत असल्याचे दिसून आले आहे. या वाढलेल्या प्रदूषणात एसओ२, एनओ२, आरएसपीएम, ओझोन, बेन्झीन, सीओ या प्रदूषकांचा समावेश आहे. 

धूळ प्रदूषणात चंद्रपूर प्रथम, मुंबई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. सल्फर डाय-ऑक्‍साईडचे प्रदूषण महाराष्ट्रात कमी असले तरी मुंबई, पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यात जास्त आहे. नायट्रोजन डाय-ऑक्‍साईडचे प्रदूषण मुंबई परिसरात, सोलापूर, पुणे, बदलापूर, उल्हासनगर येथे जास्त आहे. ओझोन प्रदूषण मर्यादेत आहे. मात्र, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, नागपूर आणि चंद्रपूर येथे अधिक आहे. कार्बन मोनोऑक्‍साइडचे प्रदूषण बांद्रा, पुणे, नागपूर, सोलापूर येथे जास्त आढळले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात धूळ आणि वायुप्रदूषण हे २००९ पासून २०१९ पर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. हे प्रदूषण घातक असून, यावर नियंत्रण होणे अत्यावश्‍यक आहे. अन्यथा, आज वाढलेले आजार हे पुन्हा वाढतील.
- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com