सत्कार समारंभाऐवजी कारभार चालवा; शिंदेंच्या भूमिकेवर अजित पवारांचे टीकास्त्र

राज्यातील काही भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
Eknath Shinde Ajit Pawar
Eknath Shinde Ajit PawarSakal

Ajit Pawar On CM Eknath Shinde : राज्यातील काही भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापपर्यंत राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊ केलेली नाही. यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील जनता त्रस्त असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्कार सभारंभात व्यस्त असून, त्यांनी हे सत्कार समारंभात सहभागी होण्याऐवजी कारभार व्यवस्थित चालवण्याचा सल्ला दिला आहे.

अजित पवार म्हणाले की, राज्यात ज्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जेथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तेथे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. राज्याचे प्रश्न सोडून मुख्यमंत्री गावोगावी सत्कार घेत फिरतात अशा शब्दांत अजित पवारांनी सरकारला फटकारलं आहे.

हेक्टरी 75 हजारांची मदत द्या - अजित पवार

राज्यात काही दिवसांपू्र्वी कोसळलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आणि सामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने त्वरीत नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करून मदत देण्याची तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजारांची मदत देण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीच नियमांचे पालन करत नसल्यावरही नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com