अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी; भाजपच्या बैठकीत सहभागी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील 'महाराजकीय नाट्या'बाबत सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) निकाल लागला असून, न्यायालयाने उद्याच (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या बहुमत चाचणी होणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी संपवून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

मुंबई - भाजपसोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आज (मंगळवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत असलेल्या भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीला उपस्थित आहेत.

महाराष्ट्रातील 'महाराजकीय नाट्या'बाबत सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) निकाल लागला असून, न्यायालयाने उद्याच (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या बहुमत चाचणी होणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी संपवून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसेच या सर्व घडामोडींचे लाईव्ह चित्रिकरण करावे लागणार आहे. यासाठी हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहे. तसेच आवाजी मतदानाने मतदान न घेता गुप्त मतदान घ्यावे असेही न्यायालयाने म्हटले आहे.

फडणवीस सरकारला झटका; उद्याच सिद्ध करावे लागणार बहुमत 

अजित पवार आज सकाळी घरातून बाहेर पडत ट्रायडंट हॉटेलमध्ये गेले होते. तेथे त्यांनी दोन तास काही नेत्यांशी चर्चा केली. तेथून ते माध्यमांना चकवा देऊन थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचले. तेथे भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीतही सहभागी झाले. आता ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit pawar bjp meeting involve in chief minister residence