#AjitPawarForCM ट्रेण्डमागे विरोधक...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या ट्विटरवर #AjitPawarForCM या हॅशटॅशचा ट्रेण्ड आला आहे. विरोधकांनी जाणीवपूर्वक हा ट्रेण्ड पसरवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुणे: सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या ट्विटरवर #AjitPawarForCM या हॅशटॅशचा ट्रेण्ड आला आहे. विरोधकांनी जाणीवपूर्वक हा ट्रेण्ड पसरवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सत्ता स्थापनेचे बहुमत सिद्ध करण्याची मुदत 3 डिसेंबर दिली आहे. त्यापूर्वी संभ्रम निर्माण करण्यासाठी हे केले जात असावे.

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकासआघाडी नेते उद्धव ठाकरे आज (गुरुवार) शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. महाशपथविधी सोहळा सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पार पडणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असून, या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी शिवाजी पार्कवर सुरू आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे.

दुसऱ्या बाजूला #AjitPawarforCM हा हॅशटॅग ट्रेण्ड टॉप टेनमध्ये आहे. नटिझन्स या हॅशटॅगचा वापर करून हास्यास्पद मीम्स शेअर करत आहेत. विरोधकांनी जाणीवपूर्वक हा हॅशटॅग तयार करून टॉप टेनमध्ये आणला आहे, असे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar for cm hashtag trend on twitter