मुख्यमंत्र्यांना साप चावला असता तर... : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

नागपुरमधील पावसात दिलीप वळसे पाटील यांच्या गाडीचेही एक चाक पाण्यात अडकले. त्यांनाही काही झाले असते तर... जबाबदार अधिकाऱ्यांना शासन झाले पाहिजे. जनतेचा पैसा असा वाया नाही गेला पाहिजे. अजून येथे पाऊस झाला तर काय उपाययोजना केल्या आहेत.

नागपूर : नागपुरात झालेल्या पावसामुळे सगळीकडे पाणी तुंबले होते. अधिवेशनाचा दिवस वाया गेला. पावसाचे पाणी काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी स्वतः गटारात झोकून बघावे लागले. रामगीर बंगल्यावर साप निघाला. मुख्यमंत्र्यांना साप चावला असता तर काय झाले असते. आज त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती. आज देखील नागपूर पाण्यात गेले आहे, अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. गेल्या आठवड्यात सुरु झालेल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी नागपुरात जोरदार पाऊस झाला होता. यामुळे विधानभवनात पाणी घुसले होते. तसेच वीजपुरवठाही खंडीत झाला होता. त्यामुळे अधिवेशनचे काम न होता, अनेक नागरिकांचे हाल झाले होते. यावरून अजित पवार यांनी सरकारला लक्ष्य केले.

अजित पवार म्हणाले, की नागपुरमधील पावसात दिलीप वळसे पाटील यांच्या गाडीचेही एक चाक पाण्यात अडकले. त्यांनाही काही झाले असते तर... जबाबदार अधिकाऱ्यांना शासन झाले पाहिजे. जनतेचा पैसा असा वाया नाही गेला पाहिजे. अजून येथे पाऊस झाला तर काय उपाययोजना केल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांनी स्वतः झोकून तुम्ही काम केले, हे सर्वांनी काम केले पाहिजे. त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडायली हवी होती. विधानसभा अध्यक्ष जसे वाकून बघत होते, तसे इतरांनी झाकून ठेवण्याची गरज नव्हती.

Web Title: Ajit Pawar criticize Devendra Fadnavis on Nagpur rain