राणेंच्या वक्तव्याला कितपत गांभीर्याने घ्यायचं ? : अजित पवार

rane.jpg
rane.jpg

मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनाकलनीय घडामोडी घ़डत आहेत. पेच कायम राहिल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला. अशातच भाजपा खासदार नारायण राणे यांनी भाजपा सत्तास्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कामाला लागण्याचं सांगितले आहे. त्यामुळे भाजपा सत्तासंघर्षात उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.

दरम्यान, सगळ्यांचे लक्ष सरकार स्थापन करण्याकडे लागले आहे. भाजपा सत्ता स्थापन करण्यात अय़शस्वी ठरल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तीन पक्ष सध्या सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा करताना दितस आहेत. जवळ जवळ त्यांची चर्चा अंतिम टप्प्यात पोचल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, बहुमताचा आकडा १४५ आमदार जुळविताना नारायण राणेंना इतर पक्षातील आमदार गळाला लावावे लागणार आहे. मात्र यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे.

नारायण राणेंच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचं हा प्रश्न आहे, सध्याच्या काळात सगळे आमदार पक्षासोबत राहतील, जर एखाद्या पक्षातील आमदार फुटला, त्याठिकाणी निवडणुका लागल्या तर ज्या पक्षाचा आमदार फुटला त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहील आणि अन्य दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील. जर असं झालं तर ३ पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कोणता माइकालाल हरवू शकत नाही असं आव्हान अजित पवारांनी नारायण राणेंना दिलं आहे. तसेच आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार आहे. विधानसभा अस्तित्वात आली नसली तरी आमदार म्हणून लोकांमधून निवडून आलेत. ते लोकांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेणार आहेत. 

दरम्यान, कोणताही एक पक्ष सत्ता स्थापन करु शकत नाही. १४५ आकडा गाठण्यासाठी मदत घ्यावीच लागणार आहे असंही अजित पवारांनी सांगितले. दरम्यान, राजीनामा देऊन जे निवडणुकीला सामोरे गेले त्यांचे काय झालं हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात जमीन आसमानचा फरक आहे. सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची बोलणी सुरु आहे. पुढे सरकार कसं चालवायचं, कोणाची काय जबाबदारी असेल हे सगळं ठरवावं लागत आहे. चर्चा सुरु असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com