संभाजी भिडेंचा ‘मास्टर माईंड कोण?; अजित पवारांचा हल्लाबोल

सोमवार, 9 जुलै 2018

वारकरी सांप्रदायासारख्या सर्वसमावेशक पंथाला आव्हान देण्याचे काम भिडे करतात. तलवारी घेवून वारीमध्ये घुसतात. त्यांची पाठराखण कोण करतेय ? असा सवाल अजित पवार यांनी केला. माजातील 97 टक्के लोकांना अशपुसश्या समजतो अश्या मनूचा उदोउदो करणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नागपूर : संत तुकाराम व ज्ञानेश्वर यांच्याबाबत अपमानकारक वक्तव्य करणारे संभाजी भिडेंना अटक करा. भिडे यांचा मास्टर माईंड कोण याचा शोध घ्या. असा हल्लाबोल अजित पवार यांनी आज विधानसभेत केला.  

वारकरी सांप्रदायासारख्या सर्वसमावेशक पंथाला आव्हान देण्याचे काम भिडे करतात. तलवारी घेवून वारीमध्ये घुसतात. त्यांची पाठराखण कोण करतेय ? असा सवाल अजित पवार यांनी केला. माजातील 97 टक्के लोकांना अशपुसश्या समजतो अश्या मनूचा उदोउदो करणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मनुस्मृतीच्या नावाने वारकरी पंथाच्या संता बाबत वादग्रस्त विधान करण्याचे धाडसचं कसे होते. पोलिसांनी नोटीस पाठवलेली असतानाही कायदा हातात घेणार्या भिडेंना अटक का करत नाहीत. असा सवाल अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. तर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही संभाजी भिडे वर संताप व्यक्त करत त्यांना वारी मधे सहभागी होण्यास बंदी घाला. अशी मागणी केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार मनुस्मृतीचे कोणत्याही स्थितीत समर्थन करत नाही. असे स्पष्ट करत संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधान व कृत्याची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिलीं 

Web Title: Ajit Pawar criticize Sambhaji Bhide