मुख्यमंत्र्यांकडून केली जातेय टोलवसूलीची तयारी : अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 18 जुलै 2019

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली कंत्राट ऑगस्ट 2019 मध्ये संपत असताना मुख्यमंत्री पुन्हा निविदा प्रसिद्ध करून टोलवसुली करण्याच्या तयारीत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केला आहे.

मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली कंत्राट ऑगस्ट 2019 मध्ये संपत असताना मुख्यमंत्री पुन्हा निविदा प्रसिद्ध करून टोलवसुली करण्याच्या तयारीत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केला आहे.

टोल वसूलीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र टोलमुक्ती आश्वासनाचे काय? असा सवालही अजिच पवार यांनी केला आहे. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सत्ताधारी का करीत नाहीत? यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्रीयमंत्री  नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात टोलमुक्ती देता येणार नसल्याचे काही दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी याबाबत वक्तव्य केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Criticizes on CM Fadnavis against Toll Issue